अंधासाठी झटणाऱ्या थोरात यांचे समाजभान जागवण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधासाठी झटणाऱ्या थोरात यांचे समाजभान जागवण्याचे आवाहन
अंधासाठी झटणाऱ्या थोरात यांचे समाजभान जागवण्याचे आवाहन

अंधासाठी झटणाऱ्या थोरात यांचे समाजभान जागवण्याचे आवाहन

sakal_logo
By

कुर्ला, ता. २१ (बातमीदार) ः अंधांसाठी नानाविध उपक्रम राबवणारे आणि त्यांचे जीवन सुकर व्हावे यासाठी झटणारे स्वागत थोरात यांनी सर्वांना समाजभान जागवण्याचे आवाहन केले. अमर हिंद मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दादर येथे आयोजित व्याख्यानमालेत ते ‘चला डोळस होऊ या, समाजभान जागवू’ या विषयावर बोलत होते.
अंधांची रंगभूमी निर्माण करणारे स्वागत थोरात यांनी आपले केलेले कार्य, अंधांनी सादर केलेले नाट्यप्रयोग यावर सविस्तर भाष्य केले. या व्याख्यानाला अध्यक्ष भास्कर सावंत, कार्याध्यक्ष अरुण देशपांडे, कार्यवाह दीपक पडते, व्याख्यानमाला समन्वयक सीमा कोल्हटकर यांच्यासह कॉलेज युवक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात जन्मलेल्या स्वागत थोरात यांना कलाकार बनण्याची इच्छा होती. स्वागत थोरात यांनी सांगितले की, अंध विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखली. अंधांच्या शाळांत जाऊन काम करायला लागलो. त्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करायला लागलो. त्यावर माहितीपट तयार केले, ते माहितीपट अत्यंत गाजले. पुण्यात झालेल्या महापौर राज्यस्तरीय एकांकिकेत १९९७ साली ८८ कलाकारांना घेऊन त्यांनी ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ ही एकांकिका बसवली. तिला प्रथम क्रमांक मिळाला. ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद घेतली गेली. त्यानंतर दुसरा विक्रम २००० साली ४४ अंध कलाकारांना घेऊन त्यांनी पु. ल. देशपांडे यांचे ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. हे अंध व्यक्तींनी सादर केलेले प्रथम नाटक ठरले.
...
२७ जिल्ह्यांत कार्यशाळा
अंधांचे जगणे सोपे व्हावे यासाठी खास प्रशिक्षण पद्धती त्यांनी विकसित केली असून महाराष्ट्रात २७ जिल्ह्यांत कार्यशाळा घेतल्या आहेत. जगातील सर्वात जास्त छापले जाणारे व वाचले जाणारे ते हिंदी भाषेतील पाक्षिक ही त्यांची अंधांसाठीची मोठी कामगिरी होय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज महाराष्ट्रातील २२ महाविद्यालयांत ब्रेल ग्रंथालये सुरू झाली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82999 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..