
ठाण्यातील तीन खेळडूंची पॉवरलिफ्टिंग एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड
ठाणे : जून महिन्यात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी ठाण्यातील तीन पॉवरलिफ्टिंग खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू ठाण्यातील युनायटेड क्लबमध्ये प्रशिक्षण घेत असून महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशनमार्फत या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ६३ वजनी गटात समृद्धी देवळेकर, ६९ वजनी गटात अक्षया शेडगे; तर पुरुषांच्या ५९ वजनी गटात धर्मेंद्र कुमार यादव या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. पुरुषांच्या गटात निवड झालेला धर्मेंद्र कुमार हा कळव्यात राहणारा असून तो मागील आठ वर्षांपासून युनायटेड क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
समृद्धी ही वरळी येथे राहणारी असून ती मागील चार वर्षांपासून ठाण्यात प्रशिक्षण घेत आहे, तर अक्षया हीदेखील दोन वर्षांपासून प्रशिक्षण घेत आहे. या तीन खेळाडूंना छत्रपती पुरस्कार विजेते आनंद चाळके हे प्रशिक्षण देत आहेत. १७ जून ते २१ जूनदरम्यान केरळ येथील अलाप्पुझा येथे आयोजित होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत हे तीन खेळाडू आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करणार आहेत.(Three players from Thane selected for Powerlifting Asian Championship)
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83015 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..