पालघरमध्ये रस्त्यांचे जाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये रस्त्यांचे जाळे
पालघरमध्ये रस्त्यांचे जाळे

पालघरमध्ये रस्त्यांचे जाळे

sakal_logo
By

पालघर, ता. २१ (बातमीदार) ः पालघरच्या ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात लवकरच रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीने सोयीस्कर असलेल्या रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २५ कोटींचा निधी या वर्षासाठी जाहीर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने रस्त्यांच्या लांबीच्या जिल्हानिहाय केलेल्या वाटपानुसार पालघर जिल्ह्याला २५ कोटी १० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा क्रमांक दोनकरिता ग्रामीण रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार रस्त्याच्या लांबीचे जिल्हानिहाय वाटप करण्यात आले आहे. यात पालघर जिल्ह्याला २५१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्याला ७५ लाख रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात विविध रस्त्यांसाठी १८८ कोटी २५ लाख रुपयांचे आराखडे तयार केले गेले होते. त्यातून जिल्ह्याला २५ कोटींचा निधी मिळाला आहे.
पुढील वर्षातही इतकाच निधी मिळणार आहे. जिल्हानिहाय निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा निधी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रस्तेविषयक योजनांसाठीच्या निधीव्यतिरिक्त असेल. १८ मे रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83016 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..