बोर्डेतील चित्रकाराची आंतराष्ट्रीय भरारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डेतील चित्रकाराची आंतराष्ट्रीय भरारी
बोर्डेतील चित्रकाराची आंतराष्ट्रीय भरारी

बोर्डेतील चित्रकाराची आंतराष्ट्रीय भरारी

sakal_logo
By

बोर्डी, ता. २१ ः लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद झाला म्हणून खचून न जाता पुन्हा जिद्दीने उभ्या राहणाऱ्या बोर्डीतील चित्रकार विजय भालचंद्र आरेकर यांची चित्रे अमेरिकेतील यॉर्क येथे आयोजित आर्ट एक्सप्रो प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. हे प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रदर्शनात आरेकर यांचे एक चित्र तब्बल एक लाख दहा हजार रुपयांना विकले गेले.
आरेकर हे मागील २५ वर्षांपासून तारापूर औद्योगिक वसाहतीत गारमेंट पेंटिंगचा व्यवसाय करतात. गुजरातमधील नागोळ येथील रुस्तम कल्याण खान फाईन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राथमिक कला शिक्षण घेऊन मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. विजय आरेकर आता आंतरराष्ट्रीय चित्रकार म्हणून ओळखले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर आरेकर यांना गारमेंट पेंटिंगचा व्यवसाय बंद करावा लागला होता. पण या काळात आपल्या घरी कॅन्व्हॉसवर ऑईल कलरचा वापर करून त्यांनी विविध चित्रे रेखाटली. या दरम्यान त्यांची तीन चित्रे न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या आर्ट एक्सप्रो प्रदर्शनासाठी रेड वूड मीडिया ग्रुपच्या माध्यमातून पाठवण्यात आली होती. त्यापैकी एक चित्र एक लाख दहा हजार रुपयांना विकले गेले. विजय आरेकर यांनी यापूर्वी मुंबईतील नेहरू सेंटर, पुणे येथील कोरेगाव पार्क तसेच विविध भागांमध्ये आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83025 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..