मुलुंडमध्ये ‘रंग जनक रागांचे’ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमध्ये ‘रंग जनक रागांचे’ कार्यक्रम
मुलुंडमध्ये ‘रंग जनक रागांचे’ कार्यक्रम

मुलुंडमध्ये ‘रंग जनक रागांचे’ कार्यक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाच्या विद्याझंकार कला विभागातर्फे ‘रंग जनक रागांचे’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर भारतीय संगीतातील दहा थाटांवर आधारित बंदिश, धृपद, सरगम, तराणा तसेच नाट्यसंगीत, ठुमरी, भजन आणि भावगीतांचा नजराणा याचा आस्वाद संगीतप्रेमींना घेता येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना अश्विनी गोखले यांची असून त्यामध्ये अश्विनी गोखले, अस्मिता गोखले, अक्षता गोखले, कार्तिकी वझे आदींचे गायन होणार आहे. तबल्यावर साथ विद्यानंद देशपांडे देणार असून संजय गोगटे संवादिनीवर साथ देणार आहेत. वर्षा जोगळेकर संगीत कार्यक्रमाचे निवेदन करतील. हा संगीत कार्यक्रम मोफत असून २८ मे रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83035 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..