मुंबई गोवा महामार्गावर अपघातात एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई गोवा महामार्गावर अपघातात एक ठार
मुंबई गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

मुंबई गोवा महामार्गावर अपघातात एक ठार

sakal_logo
By

रोहा, ता. २१ (बातमीदार) : मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला; तर टेम्पोचालक व स्कॉर्पिओमधून प्रवास करणाऱ्या तिघांसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर म्हणून स्कॉर्पिओमधून प्रवास करणारी चार लहान मुले वाचली आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलाजवळ गुरुवारी दुपारी अडीचच्‍या सुमारास घडला.
मुंबईकडून महाडकडे जाणारा स्कॉर्पिओ चालक यग्नेश दिलीपभाई पटेल याचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन् गाडीने गणपतींच्या मूर्तींनी भरलेल्या टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये स्कॉर्पिओचा पुढील भाग चेपला जाऊन प्रवासी गाडीमध्ये अडकले. यावेळी चालकासह स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्‍या प्रवाशांना स्थानिकांनी गाडीतून बाहेर काढले. जखमी प्रवासी कार्तिक पंकजभाई पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, टेम्पोचालक राकेश लक्ष्मण पाटील हा गंभीररीत्या जखमी झाल्याने नागोठणे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्‍याला नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
---------------------------------
रोहा : मुंबई-गोवा महामार्गावर स्कॉर्पिओ-टेम्पोच्या धडकेमुळे झालेले दोन्ही वाहनांचे नुकसान.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83037 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..