वाशीत बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर सेलचा छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीत बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर सेलचा छापा
वाशीत बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर सेलचा छापा

वाशीत बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर सेलचा छापा

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने वाशी सेक्टर-३० एमधील फँटासिया बिझनेस पार्क या इमारतीत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा मारून तिघांना अटक केली आहे. या त्रिकुटाने दूरसंचार विभागाचा कोणताही परवाना न घेता बेकायदेशीररीत्या इंटरनेट कॉलद्वारे अमेरिकेतील नागरिकांना खोट्या नावाने व्हायग्रा, सिआलीस व लिवेट्रो यांसारखी औषधे घेण्यासाठी संपर्क साधून सरकारचा महसूल बुडविल्याचे उघडकीस आले आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या पथकाने दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांसह वाशीतील स्पीचक्राफ्ट सोल्‍युशन प्रा.लि. या कॉल सेंटरवर छापा मारला. या वेळी कार्यालयातील ३ व्यक्ती अमेरिकन सेल्स एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून व्हीओआयपी कॉलचा वापर करून खोट्या नावाने टेलिफोनद्वारे नागरिकांची फसवणूक करत असल्याचे आढळून आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83043 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..