विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करा
विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करा

विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करा

sakal_logo
By

पालघर, ता. २१ (बातमीदार) ः विधवा प्रथा बंदीचा कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीत पहिला ठराव झाला आहे. राज्यामध्ये असाच कायदा राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालघर तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतींना आवाहन करत विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेत मांडण्याचा आणि तो मंजूर करण्याचे आवाहन केले आहे.
२१ व्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतशील समाज म्हणून आपण वाटचाल करीत आहोत. मात्र, आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे दिसून येत आहे. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसले जाते. गळ्यातील मंगळसूत्र काढणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे यांसारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जात असल्याचे दिसून आले आहे. या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यात पूर्ण सहभागी होऊ दिले जात नाही. अशा कुप्रथांचे पालन होत असल्याने या स्त्रियांना एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा मानवी तसेच संविधानिक अधिकाराचे उल्लंघन होते. या महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानित व प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे अशा अन्यायकारक प्रथा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रथेविरोधात पालघर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव मंजूर करावा व ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती करावी, असे आवाहन पालघर पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहेत.

विधवा प्रथा बंदीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करावा, असे आवाहन पालघर तालुका पंचायत समितीने केले आहे. विधवा बंदीचा ठराव आम्ही ग्रामसभेत ठेवणार आहोत. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळेल, काही समाजाने ही प्रथा बंद केली आहे. ही अनिष्ट प्रथा बंद झालीच पाहिजे, असे माझे मत आहे.
- भावना किणी, सरपंच, ग्रामपंचायत, केळवे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83055 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..