सर्वेक्षणाला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वेक्षणाला स्थगिती
सर्वेक्षणाला स्थगिती

सर्वेक्षणाला स्थगिती

sakal_logo
By

पनवेल, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याच्या नोटिसा पारगाव, कुंडेवहाळ आणि ओवळे या गावांतील नागरिकांना सिडकोकडून देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २०) पारगाव येथे सर्वेक्षण करण्यात येणार होते; परंतु प्रकल्पग्रस्त आणि लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव समितीने प्रखर विरोध केल्याने सिडको आणि मेट्रो सेंटरने नमते घेत सर्वेक्षणाला येणे टाळले. त्यामुळे सद्यःस्थितीत सर्वेक्षण व मोजणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

सिडकोने प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविता सर्वेक्षण व मोजणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी पारगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष के. ए. म्हात्रे, राजेश गायकर, २७ गाव समितीचे प्रवक्ते रूपेश धुमाळ, प्रेम पाटील, प्रवीण पाटील, बाळाराम नाईक, संपर्क प्रमुख किरण पवार, नगरसेवक विजय चिपळेकर, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, सदस्य राकेश गायकवाड, माजी सरपंच महेंद्र पाटील, कवी तारेकर, प्रल्हाद नाईक, राहुल नाईक, सुशील तारेकर, माजी उपसरपंच निशा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सिडकोकडून पुन्हा एकदा फसवणूक करण्यात येत आहे. सिडको विकसकांसाठी रेड कार्पेट, तर प्रकल्पग्रस्तांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. विविध समस्यांबाबत ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत, तसेच विमानतळाच्या भरावामुळे गावे पाण्याखाली बुडत आहेत. त्याकडे सिडको दुर्लक्ष करीत आहे. सिडकोने सर्वप्रथम या सर्व प्रलंबित समस्या सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपादनाचा विषय काढावा. २४ जूनचे आंदोलन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सरकारला इशारा देणारे असणार आहे, असे उद्‍गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83057 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..