राऊतांना शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदारकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊतांना शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदारकी
राऊतांना शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदारकी

राऊतांना शिवसेनेकडून चौथ्यांदा खासदारकी

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ ः शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय राऊत यांच्या नावावर शिवसेनेने पुन्हा शिक्कामोर्तब केले असून, त्यांना राज्यसभेची खासदारकी लढण्याची संधी मिळणार आहे. संजय राऊत येत्या २६ मे रोजी चौथ्यांचा खासदारकीसाठी अर्ज करतील. जूनमध्ये या निवडणुका होतील. तर सहाव्या जागेसाठीही शिवसेनेने दावा केला असून त्यासाठी चार जणांची नावेही आघाडीवर आहेत.

संजय राऊत यांची राज्यसभेतील खासदारकीचा तिसरा कालावधी ३१ मार्चला संपुष्टात आला. त्यानंतर आता चौथ्यांदा ते राज्यसभा खासदारकीसाठी अर्ज करतील. राऊत यांनी २००४ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेची खासदारकी मिळावली होती. त्यानंतर २०१० मध्ये पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. त्यानंतर २०१६ मध्येही ते राज्यसभेवर खासदार म्हणून गेले. २०१६-२०२२ हा तिसरा कालावधी मार्चमध्ये संपुष्टात आल्यानंतर आता पुन्हा पक्षाने त्यांच्या विश्‍वास दाखवला आहे.

गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांवर संजय राऊत यांनी शिवसेनेनेचा आवाज अतिशय आक्रमकपणे राज्यसभेत मांडला आहे. तसेच देशपातळीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांचे प्रतिनिधीत्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांमध्ये संजय राऊत यांचीही सक्रिय भूमिका राहिली. महाराष्ट्रातील अनेक विषयांवर ते अतिशय पोटतिडकीने तसेच आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे अनेक मुद्द्यांवर शिवसेनेचे केंद्रातील प्रतिनिधीत्व आणि पक्ष म्हणून वजन वाढण्यासाठीही परिणाम झाला आहे.

मनी लाँडरिंग प्रकरणावरून हल्लाबोल
पीएमएमएल कायद्यान्वये मनी लाँडरिंगचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेच्या महाराष्ट्रातील खासदारांसह संजय राऊतांनी सेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा शिवसेनेच्या सर्व खासदारांनी संजय राऊतांनी पाठिंबा दिला होता. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही हल्लाबोल करत ईडीकडे अनेकदा चौकशीची मागणी करणारे पत्र लिहूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलून दाखवले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83060 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..