निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर युवक मराठा महासंघाचा आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर युवक मराठा महासंघाचा आक्षेप
निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर युवक मराठा महासंघाचा आक्षेप

निवडणुकीतील ओबीसी आरक्षणावर युवक मराठा महासंघाचा आक्षेप

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्याबाबत अखिल भारतीय युवक मराठा महासंघाने स्थानिक स्वराज्य संस्था समर्पित आयोगासमोर आक्षेप नोंदवले. यासंदर्भात सध्या समर्पित आयोग सर्वेक्षण करीत असून महासंघाच्या उदयसिंह पाटील यांनी आयोगाच्या सदस्य सचिवांकडे आपल्या हरकती व सूचना नोंदवल्या आहेत.

राज्यातील सर्व जाती-जमातींची वैध जातनिहाय लोकसंख्या निश्चित होईपर्यंत आरक्षणाचा निर्णय घेऊ नये. ज्या मागास समूहांना राजकीय आरक्षण देण्यात येणार आहे, त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा तपासून पाहावा. या प्रक्रियेने मागास समूह निश्चित होत नाहीत, तोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू करण्यात येऊ नये. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून निवडून येण्याची क्षमता असलेल्या जातींची स्वतंत्र यादी बनवावी व त्यांचे आरक्षण गोठवण्यात यावे. तसे केल्याने मागास समूहातील अतिमागास लोकांना प्रतिनिधित्व मिळू शकेल, असेही महासंघाचे म्हणणे आहे. राज्यात ओबीसी आरक्षण लागू असलेल्या सर्व जातींची अद्ययावत जनगणना करावी. त्यांचे वास्तव्य तसेच राज्यातील नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत परप्रांतीयांची संख्या तसेच अल्पसंख्याकांची लोकसंख्या तपासावी. त्यानंतरच आरक्षण निश्चित करावे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातल्या सुनावणीसाठी सकाळची वेळ ही गावनिहाय लोकसंख्या तपासासाठी अल्प असून अनेकांना हरकती घेता येणार नसल्याचे महासंघाने म्हटले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83061 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..