आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात
आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात

आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : येत्या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नजीकच्या पडताळणी समितीकडे जाऊन पडताळणी समितीकडून १९ ते २७ मे या दरम्यान कागदपत्रांची तपासणी करून आपल्या पाल्याचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाकडून पालकांना करण्यात आले.

शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशानुसार १९ मे रोजी दुपारी ३ नंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पालकांना संदेश जाण्यास सुरुवात झाली आहे. तथापि, पालकांनी आरटीई पोर्टलवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहावी, असे सांगण्यात आले आहे. प्रतीक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रे घेऊन प्रवेश निश्चितीची पावती घ्यावी व शाळेमध्ये प्रवेश निश्‍चित करावा, असे पालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात ऑनलाईन लॉटरीनुसार निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ३४२, तर प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थी संख्या ३ हजार ७८९ इतकी आहे. निवड यादीतील ५ हजार ३४२ बालकांपैकी ३ हजार २५४ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले आहेत; तर ५४ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले असून २ हजार ३४ पालकांनी पडताळणी समितीशी/शाळेशी संपर्क साधलेला नाही. निवड यादीतील विद्यार्थ्यांकरीता प्रवेशाची वाढीव मुदत यापूर्वीच म्हणजे १० मे २०२२ रोजी संपुष्टात आलेली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83067 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..