रस्ता दुभाजकावर धडकून स्कूटी चालकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्ता दुभाजकावर धडकून स्कूटी चालकाचा मृत्यू
रस्ता दुभाजकावर धडकून स्कूटी चालकाचा मृत्यू

रस्ता दुभाजकावर धडकून स्कूटी चालकाचा मृत्यू

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : जुईनगर येथून सानपाड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्कुटी रस्ता दुभाजकाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात स्कुटीचालक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सानपाडा सेक्टर-११ मध्ये घडली. या अपघाताला स्कुटीचालक जबाबदार असल्याने सानपाडा पोलिसांनी त्‍याच्‍याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव सुमित शरद दोडके (वय २१) असे असून तो नेरूळ सेक्टर-२० मध्ये राहण्यास होता. शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुमित स्कुटीवरून कामानिमित्त सानपाडा भागात आला होता. यावेळी सुमित सानपाडा सेक्टर-११ मधील एलोरा फेस्टा इमारतीसमोर आला असताना, भरधाव वेगात असलेल्या स्कुटीवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे तो स्कुटीसह तेथील दुभाजकावर धडकला. त्यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने तो त्याच ठिकाणी जखमी अवस्थेत पडला. त्यामुळे सूरजकुमार साह व जय खाणेकर या तरुणांनी त्याला प्रथम न्यू मिलेनियम हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर त्याला महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83072 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..