मुलुंडमधील जंक्शनवर सिग्नल बसवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलुंडमधील जंक्शनवर सिग्नल बसवणार
मुलुंडमधील जंक्शनवर सिग्नल बसवणार

मुलुंडमधील जंक्शनवर सिग्नल बसवणार

sakal_logo
By

मुलुंड, ता. २२ (बातमीदार) ः मुंबईतील महत्त्वाकांक्षी जीएमएलआर प्रकल्पाची अनेक मुंबईकर वाट पाहत आहेत. प्रकल्पाला गती मिळत असताना मुख्य जंक्शनवर एकही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सिग्नल बसवावेत, अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी वाहतूक विभागाला पत्र लिहून केली होती. याबाबत आरटीओने सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच सिग्नल यंत्रणा बसविण्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना आमदार कोटेचा म्हणाले की, जीएमएलआर प्रकल्पाअंतर्गत अनेक जंक्शन येतात. मुलुंडचे राघवेंद्र स्वामीजी मार्ग जंक्शन आणि भांडुप गाव रस्ता जंक्शन (सुभाष रोड जंक्शन) या मार्गांवर वाहनांची ये-जा सुरू असल्याने वारंवार अपघात होण्याची शक्यता असते. रस्ता मोठा आहे. त्यामुळे हे अपघात टाळण्यासाठी मुख्य जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नल असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी वाहतूक विभागाला पत्र लिहून केली आहे.
कोटेचा यांच्या विनंतीनुसार वाहतूक विभाग दोन्ही ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविणार आहे. याशिवाय टी-वॉर्डलादेखील या संदर्भात वाहतूक विभागातर्फे माहिती देण्यात आली आहे. परिणामी जीएमएलआर जंक्शनवर लवकरच सिग्नल यंत्रणा बसवलेली पाहायला मिळेल.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83087 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top