घाटकोपरमध्ये १५० दात्यांकडून रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटकोपरमध्ये १५० दात्यांकडून रक्तदान
घाटकोपरमध्ये १५० दात्यांकडून रक्तदान

घाटकोपरमध्ये १५० दात्यांकडून रक्तदान

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्या वतीने असल्फा भाजी मार्केट, सूर्यमुखी गणेश मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे उपस्थित होते. या वेळी १५० हून अधिक दात्यांनी रक्तदान करत आपले कर्तव्य बजावले. सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत आयोजित या शिबिराला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देत त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समर्पण ब्लड बँकेचे या वेळी सहकार्य मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83125 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top