
सरकारी जागेचा बेकायदा वापर
वडाळा, ता. २२ (बातमीदार) ः वडाळा पूर्व येथील वडाळा मुक्त मार्ग दया शंकर चौकालगतच्या खारभूमीच्या कलेक्टर लॅण्डमधील मोकळ्या भूखंडाचा वापर लग्न व इतर कार्यासाठी बेकायदा सुरू असून याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप समाजसेवक संजय रणदिवे यांनी केला आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी खारभूमी प्रशासन, तसेच पालिका एफ उत्तर विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
संबंधित जागा ही कलेक्टर लॅण्ड आहे. तिथे विनापरवाना व्यवसाय सुरू आहे. कार्यक्रमप्रसंगी पालिकेच्या फिरत्या शौचालयांचाही वापर केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पालिकेकडे चौकशी केली असता, संबंधितांवर रितसर कारवाई करण्यात येईल. तत्पूर्वी या जागेची पाहणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून योग्य ती चौकशी करण्यात येणार आहे. तसेच फिरत्या शौचालयांचा अनधिकृत होत असलेला वापर याबाबतही चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83128 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..