उल्हासनगरातील नालेसफाई या आठवड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील नालेसफाई या आठवड्यात
उल्हासनगरातील नालेसफाई या आठवड्यात

उल्हासनगरातील नालेसफाई या आठवड्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २२ ः उल्हासनगरातील नालेसफाईची निविदा अडकून राहिली होती. आता मात्र निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने याच आठवड्यात नालेसफाई सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पावणेतीन कोटी रुपयांची ही निविदा प्रक्रिया असून त्यातून शहराच्या मधोमध वाहणाऱ्या ४८ मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. सोमवारी (ता. २३) निविदा उघडण्यात येणार असून ज्या ठेकेदाराला नालेसफाईचे कंत्राट मिळणार त्यास युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी मनीष हिवरे, विनोद केणी, एकनाथ पवार यांच्या देखरेखीखाली पोकलेन, जेसीबी मशीनच्या सहाय्याने नालेसफाई केली जाणार आहे. यासोबतच शहरात सर्व वस्त्यात असणाऱ्या लहानसहान नाल्यांची सफाई करण्यात येणार असल्याचे जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, वालधुनी नदीसंवर्धन समितीने शशिकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची भेट घेतली. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर काठावर वसलेल्या सम्राट अशोक नगर, रेणुका, आशीर्वाद सोसायटी, संजय गांधी नगर, चांदीबाई कॉलेजचा परिसर, धोबीघाट, हिराघाट, काजल पेट्रोल पंप, स्मशानभूमी, शांतीनगर, मीनाताई ठाकरे नगर, खन्ना कंपाऊंड या वसाहती पुराच्या पाण्यात जात असल्याचे लक्ष वेधले. तेव्हा वर्षातील ३६५ दिवस नदीतील गाळ, प्लास्टिक कचरा सातत्याने जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून नदीचे संवर्धन करण्यात येईल, असे आश्वासन लेंगरेकर यांनी दिले. यावेळी समितीचे शिवाजी रगडे, बंडू देशमुख, संजय घुगे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83169 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top