वालधुनी नदी किनार रासायनिक कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वालधुनी नदी किनार रासायनिक कचरा
वालधुनी नदी किनार रासायनिक कचरा

वालधुनी नदी किनार रासायनिक कचरा

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २२ (बातमीदार) ः वालधुनी नदीपात्रात सोडण्यात येणारे कारखान्यांतील रासायनिक पाणी बंद करण्याच्या मागणीवरून आंदोलने सुरू असतानाच नदीकिनारच्यी परिसरात रासायनिक कचरा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे, या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी काकोळेच्या उपसरपंचांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.
रविवारी वालधुनी नदी, जीआयपी धरण परिसरातील मोकळ्या जागेत रासायनिक कचरा टाकण्यात आल्याची घटना उघडकीला आली आहे. पांढऱ्या रंगाच्या गोणी आणि अर्धवट जळालेल्या कापसाचे गठ्ठे टाकण्यात आले आहेत. यामुळे गेल्या सुमारे १०० दिवसांपासून नदी स्वच्छतेच्या कार्यात सहभागी झालेल्या पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान रासायनिक कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काकोळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नरेश गायकर यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83178 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top