
रामानंद आर्या महाविद्यालयात परिसंवादाचे आयोजन
ठाणे, ता. २२ (बातमीदार) : रामानंद आर्या डी.ए. व्ही महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रभावीपणे लागू करण्यासाठी व उच्च शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी १८ मे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात विविध महाविद्यालयातील प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक आणि व्यवस्थापन प्रतिनिधी सामील झाले होते. परिसंवादाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाचे प्रो. कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी भुषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर.एस.माळी, मुख्य वक्ता म्हणून आय.आय.टी मुंबईचे भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वि. एन. जगताप उपस्थित होते.
शिक्षण संशोधक आनंद म्हापुसकर यांनी कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे मुख्य वक्ता वि. एन. जगताप यांनी उच्च शिक्षणातील गेल्या दोन दशकात झालेल्या उत्क्रांतीचा आढावा घेतला. आतापर्यंतचे उच्च शिक्षण हे बऱ्याच प्रमाणात ब्रिटिशकालीन आणि पाश्चिमात्य पद्धतीनुसार असल्याचे त्यांनी सांगितले. १८ व्या शतकात महात्मा फुलेंनी अनेक शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. त्यात कौशल्य विकास हाच उच्च शिक्षणाचा पाया होता असे त्यांनी अधोरेखित केले. डॉ.जगताप यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळात भारतातील विद्यापीठे प्रशासकीय संस्थाच्या रूपात पदवी प्रदान करण्याचे कार्य करत. पुढे व्हॉईसरॉय कर्झन यांनी विद्यापीठांनी शिक्षणही प्रदान केले पाहिजे असे मत प्रस्थापित केले होते. निरनिराळ्या कारणांमुळे आजही भारतातील विद्यापीठे पदवी, पदव्युत्त व संशोधन कार्यापुरती मर्यादित राहिली आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83187 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..