फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

खारघर (बातमीदार) : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील जीपॅट परीक्षेत भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. ही परीक्षा एम. फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. या परीक्षेत भारती विद्यापीठाच्या फार्मसी महाविद्यालयाची साक्षी बुंदके, यदू पिल्ले, वनश्री ठाकूर, ऋतुजा गंधे, आकाश धुमाळ, प्रशांत मुथ्ये, नर्मदा चौधरी, शुभम कांबळे, कार्तिक शानबाग, वृषाली वायदांडे, साहिल दोंडे, कृतिका घरत आणि सूचित छपाईतकर असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलासराव कदम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83199 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..