संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी
संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी

संत रोहिदास मार्गावर वाहतूक कोंडी

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : शीव रेल्वेस्थानकाकडून मुंबई शहर व पश्चिम उपनगराकडे धारावीतून जाणाऱ्या संत रोहिदास मार्गावर पालिकेतर्फे भूमिगत कामे गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहेत. यामुळे एकेरी वाहतूक चालू आहे. वर्दळीचा रस्ता असल्याने मार्गावर सतत वाहनांची रेलचेल असते. एकाच मार्गावरून जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
सिवंथी चौकात वाहने पोहचल्यावर धारावीतील ९० फुटी मार्गावर जाणाऱ्या व माहीम वांद्र्याच्या दिशेने जाणारी वाहने अडकून पडतात. अनेकदा इथे वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक नियंत्रण होत नाही. वाहनचालक पुढे जाण्यासाठी वाहने कशीही दामटतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक विभागाने दक्षता घेतली पाहिजे. अनेकदा वाहन पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहनचालकांमध्ये वाद होऊन प्रकरण हातघाईवर येते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83204 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..