उघड्या चेंबरवर झाकणे बसवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्या चेंबरवर झाकणे बसवली
उघड्या चेंबरवर झाकणे बसवली

उघड्या चेंबरवर झाकणे बसवली

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : पीएमजीपी वसाहतीसमोरील महाराष्ट्र निसर्ग उद्यानासमोरील पदपथावरील चेंबरची झाकणे नसल्याने चेंबर गेली अनेक दिवसांपासून उघडी होती. पालिकेने आता या चेंबरवर झाकणे बसवली आहेत. नाल्याची रुंदी व खोली मोठी असल्याने एखादी व्यक्ती चेंबरमध्ये पडल्यास त्या व्यक्तीस बाहेर येणे कठीण झाले असते. तसेच रस्त्यावर पादचाऱ्यांची जास्त वर्दळ नसते. यामुळे चेंबरमध्ये पडलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळू शकली नसती. यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याआधी पालिकेने चेंबरवर झाकणांची सोय करावी, अशी मागणी होत होती. पालिकेने चेंबरवर झाकणे बसवल्याने पादचाऱ्यांनी निःश्वास टाकला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83206 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top