
मानखुर्दच्या बॉक्सरची विजयी घोडदौड सुरू
मानखुर्द, ता. २३ (बातमीदार) ः अनेक राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या मानखुर्दच्या गल्ली बॉय बॉक्सर अनुज कुमारने हरियाणातील स्पर्धेतही मैदान मारत विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. त्याने हरियाणातील स्पर्धेत स्थानिक बॉक्सर संदीप कुमार याला चीत करत विजेतेपद पटकावले. शीव-पनवेल महामार्गाला लागूनच असलेल्या मानखुर्दच्या ज्योतिर्लिंगनगर झोपडपट्टीतील बॉक्सर अनुज कुमारने हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथे पार पडलेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अहिर बॉक्सिंग क्लबने आयोजित केलेल्या अबॉक्स फाईट नाईट या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण १२ सामने होते. त्यापैकी रविवारी (ता. २२) अनुजचा संदीप कुमार विरोधात सामना झाला. त्या सामन्यात चार फेऱ्या झाल्यानंतर तीनपैकी दोन पंचांनी या सामन्यात अनुजच्या बाजूने निकाल देत त्याला विजयी घोषित केले. झोपडपट्टीमध्ये राहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अनुज एक यशस्वी बॉक्सर म्हणून प्रगती करताना दिसत आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.
...
‘तुफान’ सिनेमात काम
बॉक्सिंगवर आधारित फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तुफान’ या सिनेमात अनुजने सहायक प्रशिक्षकाची भूमिका केली होती. झोपडपट्टीतील तरुणांसाठी अनुजची ही घोडदौड प्रेरणादायी ठरत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83207 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..