‘आयटीएस’ प्रकल्पाला ठाणे पालिकेचे कुलूप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयटीएस’ प्रकल्पाला ठाणे पालिकेचे कुलूप?
‘आयटीएस’ प्रकल्पाला ठाणे पालिकेचे कुलूप?

‘आयटीएस’ प्रकल्पाला ठाणे पालिकेचे कुलूप?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २३ : सहा वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला (टीएमटी) आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा देणारा, तसेच पालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत असलेला इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएस) प्रकल्प गुंडाळण्याच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. हा प्रकल्प गेली कित्येक वर्ष बंद स्थितीत असून, या प्रकल्पाला पालिकेकडूनच टाळे लावले जात आहे.
ठाण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम हा प्रकल्प नियोजित होता. सहा वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे काम पालिकेच्या वतीने ‘केपीएमजी ॲडव्हायझरी सर्व्हिसेस’ या कंपनीला देण्यात आले होते. पण गेल्या सहा वर्षांमध्ये या कंपनीने हा प्रकल्प पूर्ण केलेला नाही. या प्रकल्पामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे. याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मनसेचे आरोप
पालिकेच्या अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून प्रकल्पामध्ये खोटे काम झाल्याचे भासवून पैसे हडप केले. प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यात भ्रष्टाचार होऊनही पालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही, त्यांना फक्त पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. प्रकल्पामध्ये २६ लाखांचे एलसीडी चोरीला गेल्याचे सांगूनही पालिका अधिकाऱ्यांनी साधी चौकशीही केली नाही, असा आरोप मनसेने केला आहे.

गेले कित्येक महिने या प्रकल्पाच्या घोटाळ्याचा पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. या भ्रष्टाचारासंबंधी पोलिस चौकशी व्हावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. चौकशीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही.
- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष, मनसे जनहित विधी विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83210 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top