शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ
शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ

sakal_logo
By

वाडा, ता. २३ (बातमीदार) ः चिंचघर सेवा सहकारी सोसायटीचा अनागोंदी कारभार सुरू असून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्ज घेण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चिंचघर पाडा येथील शेतकरी वसंत धोंडू पाटील यांची वैयक्तिक व सामाईक क्षेत्र अशी दोन्ही जागा असून त्यांनी चिंचघर सेवा सोसायटीकडे कर्जाची मागणी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते याच जमिनीवर कर्ज घेत असतात व नियमितपणे फेड करीत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून एकदाही ते थकीत कर्जदार नाहीत, असे असतानाही या वर्षी त्यांना कर्ज देण्यास सोसायटीने नकार दिला आहे. दरम्यान, सोसायटीने शेतकऱ्यांस कर्ज न दिल्यास भातशेती लागवडीपासून त्यांना वंचित राहावे लागणार असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. दरम्यान, येथील शेतकरी सोसायटीचे कर्ज घेऊन वार्षिक बाजाराची साठवणूक करत असतात, शिवाय बी-बियाणे, खते आदींचीही खरेदी सोसायटीच्या कर्जावर अवलंबून असते. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज न दिल्यास त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित सोसायटीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी वसंत पाटील यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था वाडा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे.

शेतकऱ्याच्या वैयक्तिक खात्याला कर्ज देण्यास सोसायटी तयार आहे. मात्र, सामाईक खात्यासाठी सर्व खातेदारांचे संमती पत्र देणे बंधनकारक आहे.
- नरेश पष्टे, सचिव, चिंचघर सेवा सहकारी सोसायटी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83246 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..