अखेर खारघर वसाहतीत मान्सूनपूर्व कामे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर खारघर वसाहतीत मान्सूनपूर्व कामे
अखेर खारघर वसाहतीत मान्सूनपूर्व कामे

अखेर खारघर वसाहतीत मान्सूनपूर्व कामे

sakal_logo
By

खारघर, ता. २३ (बातमीदार) : पनवेल महापालिका प्रशासनाकडून खारघर वसाहतीतील नाले, गटारे साफसफाईची मान्सूनपूर्व कामे सुरू झाली आहेत. पावसाळ्याला काही दिवसच शिल्लक असल्याने महापालिकेने लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर पालिकेने तत्काळ एजन्सीची नेमणूक करून पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाला सुरुवात केली आहे.

खारघर वसाहतीत दर वर्षी सिडकोकडून सेक्टरनिहाय एजन्सीची नेमणूक करून मान्सूनपूर्व कामे केली जात असत. पावसाळी कामे मे महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे. दरम्यान यंदा मे सुरू झाल्यानंतरही पावसाळी कामाला सुरवात झाली नव्हती. त्यामुळे पावसाळी कामे कोण करणार, असा प्रश्न खारघरवासीयांना पडला होता. सदर कामांसंदर्भात सिडको आणि पालिका प्रशासन टोलवाटोलवी सुरू होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी पालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी या वर्षी सिडकोने पावसाळी कामे करावीत, असे पत्र सिडकोला दिल्याचे सांगितले होते; तर खारघर वसाहत पनवेल पालिकेकडे हस्तांतरण झाल्यामुळे सदर कामे पालिकेने करावीत, असे पत्र सिडकोकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पालिकेला पाठविण्यात आले होते.

अखेर पालिका प्रशासनाने खारघरमधील मान्सूनपूर्व कामे सुरू केल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. याविषयी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खारघर नोडसाठी पालिकेने स्वतंत्र एजन्सीची नेमणूक केली असून त्यासाठी दोन कोटीहून अधिक खर्च करणार असल्याचे सांगितले.

सिडको अधिकारी टेन्शनमुक्त
मान्सूनपूर्व कामांची नोटीस खारघरमधील सिडकोच्या कार्यालयाबाहेर प्रसिद्ध होताच, खारघर, बेलपाडा, कोपरा, मुर्बी, ओवे, ओवेपेठ, रांजणपाडा आणि पापडीचा पाडा आदी गावातील प्रकल्पग्रस्तांकडून निविदा भरली जात असे. त्यात कामाचा अनुभव नसलेल्याकडूनदेखील निविदा भरली जात असे. त्यामुळे काम कोणाला द्यावे, असा प्रश्न सिडको अधिकाऱ्यांना पडत असत. त्यात ठेका दिला तर पावसाळी कामे वेळेत पूर्ण करतील की नाही, असाही प्रश्न अधिकाऱ्यांना पडत असे. मात्र यावर्षी खारघर वसाहत पालिकेकडे हस्तांतरण झाल्यामुळे पावसाळी कामातून मुक्त झाल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

खारघरमध्ये पालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे. पाणी तुंबण्याचे ठिकाण आहे, त्या ठिकाणी प्राधान्य देऊन प्रथम कामे केली जात आहेत. सदर काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83256 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top