
भावनांच्या आधारे शब्द काव्यरूप घेतात!
वसई, ता. २३ (बातमीदार) ः मनातील विचारांतून आलेले शब्द हे भावनेच्या आधारे काव्याचे रूप घेतात. वाचकांच्या हृदयाला स्पर्श करत असतात. ते जनमानसाच्या मनाला थेट भिडून घर करतात, असे उद्गार पालघर तालुका साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष कमलाकर राऊत यांनी विरार येथे काढले.
मयुरेश प्रकाशन व अभिव्यक्ती या संस्थेच्या वतीने विरार पश्चिम येथील मंगलमूर्ती मंदिर ट्रस्टच्या सभागृहात चर्चा-परिसंवाद व काव्यसंग्रह प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कमलाकर राऊत, कवी व्रजेश सोलंकी, मयुरेश वाघ, कवयित्री साधना चौधरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘जगण्याचा सोहळा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
लेखक, कलावंत, कवी यांच्यासमोर अनेक अडचणी असतात. मात्र, यावर मात करत अनेक पुस्तके , काव्य प्रकाशित होत असतात व त्याचा आनंद वाचकांना घेता येतो. प्रतिभा आणि अभिव्यक्ती कवितेतून सादर होत असते. साहित्य व लेखनाच्या क्षेत्रात योगदानाची नितांत गरज आहे, अशा शब्दांत लेखक उमाकांत वाघ यांनी भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संयोजक विजय उमर्जी यांनी सोशल मीडिया व जनभावना जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले, तर जयप्रकाश चौधरी, हेमंत राऊत, शेखर अभ्यंकर आदींनी सोशल मीडिया फायदे व तोटे यावर भाष्य केले. यावेळी वैष्णवी मेस्त्री, लायन राजेश बक्षी, डॉ. अनिरुद्ध चव्हाण, मयुरेश प्रकाशनच्या रिना वाघ आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83259 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..