महापालिकेच्या नव्या शाळांचे नामकरण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या नव्या शाळांचे नामकरण होणार
महापालिकेच्या नव्या शाळांचे नामकरण होणार

महापालिकेच्या नव्या शाळांचे नामकरण होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. २३ : पनवेल महापालिकेतर्फे कन्या शाळेच्या जागेवर नव्याने तयार करण्यात आलेल्या दोन शाळांचे लवकरच नामकरण होणार आहे. सत्ताधारी भाजपतर्फे प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती उपलब्‍ध झाली आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्‍या नावाचाही विचार होण्‍याची शक्‍यता असून, या नावाला विरोधी पक्षाकडूनही पसंती मिळाली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणारी कन्या शाळेची इमारत जुनी झाल्याने ती पाडून त्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्यामुळे आता या नव्या इमारतीमध्ये सरस्वती विद्यामंदिर, हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालय आणि पूर्वीची कन्या शाळा अशा तीन शाळा एकत्रीकरण करून भरवण्यात येणार आहे. तसेच या शाळेत महापालिकेतर्फे नवीन इंग्रजी माध्यमाची शाळादेखील प्रस्तावित करण्यात आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा मानस आहे. त्यामुळे या दोन्ही शाळांना नाव सुचवण्याची विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
नावाबाबत एकमत
सत्ताधारी आणि विरोधकांचे नावाबाबत एकमत व्हावे, याकरिता महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या दालनात बैठकही झाली. सत्ताधाऱ्यांकडून लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव ठरल्‍याची माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. तर दुसऱ्या शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी सुचवल्याची चर्चा आहे. या दोन्ही नावांबाबत सत्ताधाऱ्यांच्या होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत या नावांचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत प्रकाश बिनेदार आणि अनिल भगत यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. तसेच या नावांवर विरोधकांची भूमिका सभागृहात स्पष्ट होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83282 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..