दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दरड प्रवण क्षेत्रातील 
नागरिकांचे स्थलांतर होणार
दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर होणार

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : मुंबईत यंदाही दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने दरड प्रवण भागातील लोकांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचे मुंबई महापालिकेने नियोजन केले आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत विविध प्राधिकरणांच्या मदतीने या नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी प्रकल्पाची आखणी करत आहे.
दरडप्रवण भागातील नागरिकांसाठी ३० हजार घरे बांधण्याबाबत काही दिवसांपूर्वी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सूतोवाच केले होते. त्यानुसार म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्याचा महापालिकेचा विचार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात दरडप्रवण क्षेत्राचा समावेश आहे. पावसाळ्यात या घटनामुळे नागरिकांचे जीव जाऊ नये म्हणून महापालिकेने या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईत प्रामुख्याने एस वॉर्ड, एन वॉर्ड आणि एम पश्चिम भागात दरडींचा धोका आहे. काही ठिकाणी झोपडपट्टी वाढल्याने रहिवासी वस्तीत आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहचणे कठीण जाते. म्हाडा, एसआरए या प्राधिकरणांशी चर्चा करून येथील रहिवाशांचे कसे स्थलांतर करता येईल, याबाबत महापालिकेकडून तयारी केली जात आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
---
उपाययोजनांना सुरुवात
दरडप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रामुख्याने संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पाण्याचा प्रवाह मोकळा करणे, संरक्षक भिंतीचे होल मोकळे करणे, वाढलेल्या झाडांची छाटणी करणे, आदी कामे केली जात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83290 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..