अँप बेस्ड टॅक्सी कंपन्यांना न्यायालयाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अँप बेस्ड टॅक्सी कंपन्यांना न्यायालयाचा दिलासा
अँप बेस्ड टॅक्सी कंपन्यांना न्यायालयाचा दिलासा

अँप बेस्ड टॅक्सी कंपन्यांना न्यायालयाचा दिलासा

sakal_logo
By

ॲपआधारित टॅक्सी
कंपन्यांना न्यायालयाचा दिलासा
तात्पुरत्या परवान्याला आणखी मुदतवाढ
मुंबई, ता. २३ : ओला, उबर आणि इतर १० अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाने प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत तात्पुरते परवाने मंजूर केले होते. मे महिन्यात त्यांना काही त्रुटींची पूर्तता करून त्यासंबंधित कागदपत्रांची पूर्तता परिवहन विभागाकडे करायची होती; मात्र या कंपन्यांनी अद्याप पूर्तता केली नाही. दरम्यान, उबर कंपनीने परिवहन विभागाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या कंपन्यांना तात्पुरता परनान्यावर व्यवसाय करण्यास परवानगी दिल्याने ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

ओला, उबर कंपन्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांनी परिवहन विभागाकडे अर्ज करावेत; तसेच परिवहन विभागाने त्यांना तात्पुरते परवाने देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यभरात या परवान्यासाठी २९ अर्ज आले होते. त्यापैकी ओला, उबरसह १२ अ‍ॅपआधीरित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना तात्पुरते परवाने देण्यात आले; तर १७ अर्ज विचाराधीन ठेवण्यात आले; मात्र आता या कंपन्यांनी कागदपत्रांच्या त्रुटींची पूर्तताच केली नसल्याचे निदर्शनास आले. यामध्ये चालकांची ओळखपत्रे, लायसन्स, बॅच बिल्ला, किमान वाहन चालवण्याचा अनुभव, बँक खात्याचा तपशील, चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, आरोग्य विमा, वाहनांचे नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, विमा आदी माहिती सादर करण्यात आली नाही. त्यातच उबर कंपनीने परिवहन विभागाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने ॲपआधारित टॅक्सी कंपन्यांना तात्पुरत्या परवान्यावर व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83292 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top