अट्टल सोनसाखळी चोरांना अटक, 9 गुन्हे उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अट्टल सोनसाखळी चोरांना अटक, 9 गुन्हे उघडकीस
अट्टल सोनसाखळी चोरांना अटक, 9 गुन्हे उघडकीस

अट्टल सोनसाखळी चोरांना अटक, 9 गुन्हे उघडकीस

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : पादचारी, महिलांना लक्ष्‍य करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातील तब्बल ५० हून अधिक सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे चेन चोरीच्या घटना, आरोपींच्या वेळा, येण्या-जाण्याच्या त्यांच्या वेळा आदी गोष्टींवर लक्ष ठेवत मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रमेश पालीवाल (वय ३४) व महेश जठ (वय ३५) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधातील एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून पोलिसांनी १५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीत वापरलेली दुचाकी जप्त केली.
भिवंडीतील दोन सोनसाखळी चोरटे रात्रीच्या वेळी मोटरसायकलवरून कल्याण-डोंबिवलीत दाखल होऊन ज्येष्ठ नागरिक व महिलांना लक्ष्‍य करीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून फरारी होत असल्याचे आढळून आले होते. या चोरांवर तब्बल महिनाभर पाळत ठेवत रमेश व महेश यांना मानपाडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. दागिने चोरून ते ओळखीच्या सोनारांकडे घरातील दागिने आहेत, असे सांगत विक्री करत असल्‍याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83300 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..