रेल्वे अलार्म चेनचा गैरवापर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे अलार्म चेनचा गैरवापर!
रेल्वे अलार्म चेनचा गैरवापर!

रेल्वे अलार्म चेनचा गैरवापर!

sakal_logo
By

कल्याण, ता. २४ (बातमीदार) ः कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे अलार्म चेन खेचण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत १ जानेवारी ते १९ मे २०२२ या काळात ३०४ गुन्हे दाखल करण्यात आले असून १९६ जणांना अटक करण्यात आली आहे.
कल्याण रेल्वेस्थानकामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकल, एक्स्प्रेस सुटण्याच्या वेळेपूर्वी स्टेशनवर येऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मात्र काही जण लोकल, मेल गाड्या सुटण्याच्या वेळी लोकल पकडण्यासाठी अलार्म चेन पुलिंग करत असल्याचे दिसून येते. यामुळे गाड्यांना आणखी विलंब होतो आणि उपनगरीय गाड्यांच्या धावण्यावर परिणाम होतो. त्यामुळे कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा रेल्वे स्थानकात रेल्वे अलार्म चेन गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईला रेल्वे सुरक्षा बलाने सुरुवात केली आहे.

दृष्टिक्षेपात
अलार्म चेन खेचण्याचे गैरप्रकारांची नोंद - ३६७
गुन्हे दाखल - ३०४
अटक - १९६

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83322 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top