घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

sakal_logo
By

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून घणसोली क्षेत्रात सिडकोच्या जागेवर अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. याप्रकरणी सिडको व नवी मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली होती. अखेर महापालिका व सिडकोकडून आज संयुक्त कारवाई करण्यात आली.

दत्तनगर, शिवाजी तलाव परिसरातील सिडकोच्या जागेवर अनधिकृत बांधण्यात आले आहे. या इमारतींवर सिडको व पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. तसेच घणसोली सेक्टर ९ येथील ए. एस. पी. स्कूलद्वारे सिडकोच्या जागेवर बेकायदा फुटबॉल टर्फ बांधण्यात आले होते. ते जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले असून शाळेला ५० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला.

चार वर्षांनंतर प्रथमच सिडको आता मैदानात उतरून कारवाई करत आहे. आतापर्यंत तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. या वेळी दोन पोकलेन, सिडको व पालिकेचे अधिकारी, १५-२० कामगार उपस्थित होते. तसेच सिडकोच्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलेल्या ठिकाणांवर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संयुक्त कारवाईचा सपाटा सुरू ठेवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने नवी मुंबईतील भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83365 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top