उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नवी मुंबईत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नवी मुंबईत
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नवी मुंबईत

उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी नवी मुंबईत

sakal_logo
By

वाशी, ता. २४ (बातमीदार) : क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई आणि युथ असोसिएशन नवी मुंबई यांच्या वतीने कोरोना योद्‍ध्‍यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटसमयी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवून नव्याने संसार उभा करण्यास सर्वतोपरी मदत करणाऱ्यांचा नवी मुंबईरत्न अवॉर्ड देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असल्याचे क्रेडाई अध्यक्ष विजय लखानी यांनी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात या नवी मुंबईरत्न अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन २७ मे २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कोरोनाच्या महामारीत देवदूत म्हणून सेवाकार्य करणाऱ्या डॉक्टर्स, पोलिस, परिचारिका, रुग्णवाहिका चालक, सुरक्षा रक्षक, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश असल्याचे क्रेडाईचे सरचिटणीस संग्राम पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83396 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top