घोणशे घाटात ट्रकचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोणशे घाटात ट्रकचा अपघात
घोणशे घाटात ट्रकचा अपघात

घोणशे घाटात ट्रकचा अपघात

sakal_logo
By

म्हसळा, ता. २४ (बातमीदार) ः सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक न लागल्याने भीषण अपघात झाला. ही घठना घोणशे घाटात घडली. घोणशे घाटातील गेल्या पंधरा दिवसातील अपघाताची ही तिसरी घटना आहे. आजच्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकाला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिमेंट वाहून नेणारा हा ट्रक (एमएच ५ एएम ३२०२) तुर्भे येथून अल्ट्राटेक कंपनीचा सिमेंट घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे जात होता. हा ट्रक घोणसे घाटातील एक घातक वळणावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल होऊन हा अपघात झाला. म्हसळा घोणसे घाट म्हणजे अपघाताचा केंद्रबिंदूच झाला आहे. इथे सुरू असणारी अपघातांची मालिका कशी थांबणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83417 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top