सफाई कामगारांच्या घरावरच कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगारांच्या घरावरच कारवाई
सफाई कामगारांच्या घरावरच कारवाई

सफाई कामगारांच्या घरावरच कारवाई

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ ः पावसाळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने महापालिकेकडून नालेसफाईसह अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. त्यातच नालेसफाईची कामे करणाऱ्या कामगारांच्या घरांवर महापालिकेने आज बुलडोझर चालवला. मुंबई महापालिकेने बेघर झालेल्या कुटुंबीयांचे तातडीने पुनर्वसन करून घरे द्यावीत, अशीही मागणी करण्यात आली.

महापालिकेने मंगळवारी (ता. २४) बोरिवलीच्या महावीर नगर परिसरातील सुमारे ७० सफाई कामगारांची घरे जमीनदोस्त केली. गेल्या दहा वर्षांपासून परिसरात वास्तव्य करणारे हे कामगार महापालिकेच्या कंत्राटदाराकडे नालेसफाई आणि मातीकाम करतात. कोविड महामारीदरम्यान स्वच्छतेचेही महत्त्वाचे काम या कामगारांनी केले; मात्र आगामी पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिकेने कारवाई करत कामगारांच्या झोपड्यांवर तोडक कारवाई केली. महापालिकेतर्फे बेघर नागरिकांचे सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत कोणतीही कारवाई केली जाऊ नये, असे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचे आदेश आहेत; तरीही जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. मुंबई महापालिकेने बेघर झालेल्या कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करून घरे द्यावीत, अशीही मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83444 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top