
मुंबईतील ऐतिहासिक वास्तू बिल्डरांच्या घशात
मुंबईस ता. २४ : मुंबई शहरात राज्य सरकार नियुक्त हेरिटेज कमिटी (ऐतिहासिक वारसा समिती) अस्तित्वात असतानाही शहरातील काही वास्तू परवानगीविना तोडण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी परस्पर परवानगी दिली, असा आरोप भाजप आमदार शेलार यांनी केला. जगभरात ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न होत असताना मात्र शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेकडून अशा वास्तू तोडण्याच्या परवानग्या विकसकांना जलदगतीने दिल्या जात आहेत, असेही शेलार म्हणाले.
मुंबईत श्रेणी ३ मधील २५० जुन्या इमारती आणि स्ट्रक्चर तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी परवानगी कुण्याच्या सांगण्यावरून दिली, तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्व असलेल्या या वास्तूंकडे पर्यटनमंत्र्यांचे लक्ष आहे का, असा सवालही शेलार यांनी केला. ऐतिहासिक वास्तू तोडून ती जागा विकसकांच्या खिशात घातली जाणार आहे. त्यातून विकसकांचा ७० हजार कोटींचा फायदा होणार असल्याचेही शेलार म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83460 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..