
प्रमाणिक रिक्षा चालकामुळे प्रवाशाला बॅग परत मिळाली
कल्याण, ता. २५ (बातमीदार) ः एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात विसरलेली प्रवाशाची बॅग आणि इतर साहित्य रिक्षा संघटनेच्या कार्यालयामध्ये जमा केले. संघटनेने प्रवाशाचा शोध घेत रिक्षात विसरलेले सामान परत केले.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिममधील खडकपाडा गोदरेज हिलमधील राहणारे कुशल हरीराम कुमार यांनी सोमवारी (ता २३) दुपारी रिक्षाचालक हौशिला प्रसाद मिश्रा यांच्या रिक्षातून खडकपाडा ते कल्याण रेल्वेस्थानक असा प्रवास केला. कुमार हे रिक्षा उतरताना आपली बॅग आणि इतर साहित्य रिक्षात विसरून पुढे निघून गेले. ही बाब हौशिला मिश्रा यांच्या लक्षात येताच त्यांनी कुमार यांची बॅग व इतर साहित्य रिक्षा संघटनेच्या कार्यालयात जमा केले. त्यानंतर रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅग विसरलेल्या प्रवासी कुमार यांचा शोध घेतला. कुशल कुमार यांनी रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व रिक्षा-टॅक्सी चालक मालक असोसिएशन संघटनेचेही आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83469 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..