जुईनगर स्थानक समस्यांच्या गराड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगर स्थानक समस्यांच्या गराड्यात
जुईनगर स्थानक समस्यांच्या गराड्यात

जुईनगर स्थानक समस्यांच्या गराड्यात

sakal_logo
By

घणसोली, ता. २५ (बातमीदार) : आधुनिक शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. ठाणे ते नेरूळ आणि ठाणे-वाशी मार्गावरील अनेक रेल्वेस्थानकांची दयनीय अवस्था झाली आहे. रेल्वेस्थानक परिसराला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे; परंतु वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासन या समस्यांकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र समोर आले आहे.

स्थानकाच्या आवारात कचरा, भिंतींना लागलेली पाण्याची गळती, वाहनांची बेकायदा पार्किंग, गर्दुले, तळीराम, बेकायदा स्टॉल्स, तसेच प्रवाशांना त्रास देणारे तृतीयपंथींचे घोळके अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. जुईनगर रेल्वेस्थानकात अनेकदा तळीराम मारामारी करत प्रवाशांना दारूच्या नशेत शिवीगाळ करताना दिसतात. तसेच तिकीट वेंडिंग मशीन अनेक दिवसांपासून धूळखात पडल्या आहेत. रेल्वे वेळापत्रक दर्शक दाखविणारे काही इंडिकेटर बंद अवस्थेत असल्यामुळे अनेक प्रवाशांना गाड्यांच्या वेळा कळू शकत नसल्याने फलाटापर्यंत धावपळ करावी लागते. तिकीट खिडकीजवळ भिकाऱ्यांची, तसेच फेरीवाले वर्षाचे बाराही महिने झोपलेले असतात.

स्थानकावर असलेले सार्वजनिक शौचालयाचे गेट आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्याचे पाईप आणि खराब झालेल्या नळांना गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. शौचालयाची वेळच्या वेळी साफसफाई होत नसल्याने फार दुर्दशा झाली आहे. सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची फौज असूनही या स्थानकातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आजही कायम आहे.

जुईनगर रेल्वेस्थानकावर नेहमी समस्या पाहायला मिळतात. वाहनांची बेकायदा पार्किंग, बेकायदा स्टॉल्स, गर्दुले असतात. यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- प्रश्नांत माने, रेल्वे प्रवासी

जुईनगर रेल्वेस्थानकातील दुरुस्ती, डागडुजी आणि सुरक्षेसंदर्भात सिडको प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. स्थानकाची संबंधित विभागाने पाहणी करून दुरुस्ती, तसेच डागडुजी करून प्रवाशांना दिलासा द्यावा, असे सांगण्यात आले आहे.
- एन. के. झा, स्थानक व्यवस्थापक, जुईनगर.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83477 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top