जुन्या इमारतीवर दुरूस्तीसाठी लाखोंची उड्डाणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्या इमारतीवर दुरूस्तीसाठी लाखोंची उड्डाणे
जुन्या इमारतीवर दुरूस्तीसाठी लाखोंची उड्डाणे

जुन्या इमारतीवर दुरूस्तीसाठी लाखोंची उड्डाणे

sakal_logo
By

वाडा, ता. २५ (बातमीदार) ः वाडा शहरातील विविध सरकारी कार्यालयांच्या इमारती जुनाट व जीर्ण झाल्या आहेत. काही इमारतींना तर ११० ते ११५ वर्षे झालेली असतानाही त्या इमारतींची प्रत्येक वर्षी दुरुस्ती केली जाते. या दुरुस्तीवर लाखोंची उड्डाणे घेतली जात आहेत. मात्र, नवीन इमारतीचा प्रस्ताव न बनवता नेहमीच जुन्या इमारतीची दुरुस्ती केली जात असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वाडा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे अनेक सरकारी इमारती आहेत. यामध्ये तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, पंचायत समिती, कृषी विभाग, वनविभाग, मंडळ अधिकारी कार्यालय, तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहाय्यक निबंधक विभाग आदी कार्यालये आहेत. यातील बरीचशी कार्यालये ही शंभर वर्षे जुनी आहेत.
तहसील व पोलिस ठाणे या इमारतींना पावसाळ्यात गळती लागते. त्यामुळे या दोन्ही इमारतींवर पत्रे टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असून या दोन्ही इमारतींच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. त्याच त्याच इमारतींची प्रत्येक वर्षी दुरुस्ती करून लाखोंचा खर्च केला जातो.

नवीन इमारत बांधण्याची मागणी
नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव बनवला जात नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेहमीच दुरुस्तीमध्ये लाखो रुपयांचा मलिदा अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांना मिळत असल्याचा आरोप नागरिक करीत असून या इमारती म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचे बोलले जात आहे. तहसील कार्यालय व पोलिस ठाणे दुरुस्तीच्या माहिती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल बरसट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83499 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top