
सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड स्पर्धेसाठी निवड
नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने (पोवंटा साहिब) हिमाचल प्रदेश या ठिकाणी भारतीय बॉडी बिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली. यात महामार्ग पोलिस विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांची ८० किलो वजनी गटामध्ये भारतीय संघात निवड करण्यात आली. मिस्टर आशिया २०२२ ही स्पर्धा १५ ते २१ जुलै दरम्यान मालदीव येथे होणार आहे, तर ६ ते १२ डिसेंबरदरम्यान मिस्टर वर्ल्ड ही स्पर्धा (फुकेत) थायलंड येथे होणार आहे.
पुजारी दररोज पाच तास सराव करतात. या पूर्वी त्यांनी ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. तसेच सलग दोन वेळा मास्टर भारतश्री व मास्टर महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे. त्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83504 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..