टोलबुडव्या वाहनांचा पनवेल-मुंब्रा महामार्गावर भार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पनवेल-सायन महामार्गावर कामोठे टोल नाक्यावर टोल भरायला लागू नये याकरिता तळोजा लिंक रोडमार्गे अनेक वाहने पनवेल-मुंब्रा महामार्गावर
टोलबुडव्या वाहनांचा पनवेल-मुंब्रा महामार्गावर भार

टोलबुडव्या वाहनांचा पनवेल-मुंब्रा महामार्गावर भार

नवीन पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे टोल नाक्यावर टोल भरायला लागू नये याकरिता तळोजा लिंक रोडमार्गे अनेक वाहने पनवेल-मुंब्रा महामार्गावर येतात. त्यामुळे रोडपाली सिग्नल आणि कळंबोली सर्कलला मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक होते. पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण झाल्याने वाहने सुसाट धावतात. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत नाही.

मुंबई, त्याचबरोबर गोव्याकडे जाणारी वाहने टोल वाचविण्याकरिता कामोठे तसेच कळंबोलीला पनवेल-सायन महामार्गावरून न जाता तळोजा लिंक रोडने रोडपाली सिग्नल येथून पुणे-गोव्याच्या दिशेने जातात. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर गुजरात तसेच उत्तरेकडील राज्यातून वाहने शीळ फाटा येथून येतात. कळंबोली स्टील मार्केट, तसेच जेएनपीटीकडे अवजड वाहने जातात. त्यामुळे पनवेल- मुंब्रा महामार्गावर नेहमीच रहदारी असते. त्यात टोल वाचवण्यासाठी अनेक वाहने या मार्गावरून जात असल्‍याने कोंडीत आणखी भर पडते. रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कलपर्यंत पोचण्याकरिता काही वेळा एक ते दीड तास वेळ लागतो. दोन-अडीच किमी अंतरासाठी इतका वेळ लागत असल्याने वेळ, तसेच इंधन वाया जाते. शिवाय वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना धावाधाव करावी लागते.

तळोजा लिंक रोडवर हवा टोल नाका
पनवेल-सायन महामार्गावरून पुणे तसेच गोवा बाजूकडे जाणारी वाहने टोल वाचवण्याकरिता तळोजा लिंक रोडमार्गे कळंबोली जंक्शनला जातात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून लिंक रोडच्या आधीच पनवेल-सायन महामार्गावर टोल नाका उभारावा, असा प्रस्ताव कळंबोली वाहतूक शाखेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे.

टोल वाचवण्यासाठी अनेक वाहनचालक तळोजा लिंक रोडचा वापर करून रोडपालीमार्गे मुंब्रा महामार्गावर प्रवेश करतात. त्यामुळे रोडपाली, फूड लॅन्ड चौक व कळंबोली सर्कल परिसरात वाहतूक कोंडी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलनाका खाडी पुलाच्या मागे बांधावा, त्यामुळे कळंबोली सर्कलवरील वाहतुकीचा ताण कमी होईल.
- निशिकांत विश्वकर, वरिष्ठ निरीक्षक कळंबोली वाहतूक पोलिस

टोल भरावा लागू नये, याकरिता मोठी वाहने खुश्कीचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे पनवेल-मुंब्रा रोडवर वाहतूक कोंडी होते. लहान वाहनांनासुद्धा त्यामध्ये अडकून पडावे लागते. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचा टोलही बुडवला जातो. त्यानुसार टोल नाका खाडीपुलाच्या समोरच उभारण्यात यावा, अशी मागणी बांधकाम विभागाकडे करणार आहे.
- रणजित नरूटे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पनवेल

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83515 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top