मोहम्मदच्या पालकांचा शोध घेण्यात यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहम्मदच्या पालकांचा शोध घेण्यात यश
मोहम्मदच्या पालकांचा शोध घेण्यात यश

मोहम्मदच्या पालकांचा शोध घेण्यात यश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : पंजाब येथील अकरा वर्षीय मुलगा चुकीच्या गाडीत बसल्याने उल्हासनगर येथे पोहोचला होता. दिल्लीहून पंजाबला जाण्यासाठी तो निघाला होता, पण चुकून मुंबईच्या गाडीत बसला. १८ मे रोजी त्याला उल्हासनगर येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. या मुलाच्या पालकांचा शोध लावण्यात ठाणे शहर पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद राजा असे या मुलाचे नाव असून तो मूळचा पंजाब येथील आहे. त्याला लवकरच त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती चाईल्ड युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उल्हासनगर बालगृहाचे समुपदेशक संतोष खोपडे यांनी मोहम्मद हा विनापालक सापडल्याची माहिती पोलिस हवालदार सुनील साळवी यांना दिली होती. चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने मोहम्मदला विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने त्याचे गाव पंजाबच्या पटीयाला जिल्ह्यातील अनाज मंडी असल्याचे सांगितले. पंजाबमधील बालकल्याण विभागात काम करणारे गुरूमीत सिंग यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून, तसेच तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क करून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आला. मोहम्मदचे वडील दिल्ली येथे टेलरिंगचे काम करत असल्याचे तपासात आढळून आले. मोहम्मदच्या पालकांचा शोध युनिटचे पोलिस उपनिरीक्षक संदीप खाडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शामराव कदम, विजय बडगुजर, पोलिस हवालदार सुनील साळवी, हनुमंत तळेकर, सुधाकर चौधरी, पोलिस नाईक तेजश्री शिरसाठ, पोलिस शिपाई सविता दोंदे, संगीता कांबळे, सुवर्णा यादव व सहायक पोलिस उपनिरीक्षक वेगुर्लेकर यांनी घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83553 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top