
खांजन जमिनीतील भरावाला विरोध
डहाणू, ता. २५ (बातमीदार) ः डहाणूतील सागरी महामार्गावरील तीन रस्त्यांच्या उत्तरेकडील खाजण जमिनीत उत्खनन करून भराव घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबरच पुराचे पाणी अडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डहाणूतील मानवी वस्तीत पाणी भरण्याची शक्यता आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ॲड. धनंजय मेहेर यांच्या नेतृत्वाखाली डहाणूतील नागरिकांनी ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
सागरी महामार्गावरील तीन रस्त्यांच्या उत्तरेकडील खाजण जमीन ही काही सरकारी तर काही खासगी मालकीची आहे. या जमिनीतूनच समुद्राच्या भरतीचे आणि पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी नैसर्गिक नाला आहे. या खाजण जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी भरत असल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत नाही. मात्र खाजण जमीन मालकांनी उत्खनन करून, हा नैसर्गिक नाला बंद करून भरावाचे काम सुरू केले आहे. या जमिनीत भराव केल्यास, समुद्राच्या भरतीचे पाणी आणि पुराचे पाणी अडून ते आजूबाजूच्या मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. घरात पाणी घुसून अनेक संसार उघड्यावर पडणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेची आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीसाठी ॲड. धनंजय मेहेर यांच्या नेतृत्वाखाली डहाणूतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी डहाणू पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी पोलिस कुमक मागवून वाहतूक सुरळीत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83555 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..