चारचाकीला अपघात; एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारचाकीला  अपघात; एकाचा मृत्यू
चारचाकीला अपघात; एकाचा मृत्यू

चारचाकीला अपघात; एकाचा मृत्यू

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २५ (बातमीदार ) ः चारचाकी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला; तर गाडीतील अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास अंबरनाथमधील लोकनगरी बायपास येथे घडली.

अपघात झालेली आर्टिका गाडी लोकनगरी बायपासवरून जात होती. पहाटे तीनच्या सुमारास चालक सागर चांदवानी याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळून उलटली. यात गाडीतील सर्वजण जखमी झाले. उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले होते. पण अनिल पंजाबी (वय ३७) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात बंटी नागदेव, दिनक दुसेजा, नरेश कासेला, चालक सागर चांदवानी किरकोळ जखमी झाले आहेत; तर संजू चंदानी हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर प्रथमोपचार करून मुंबईला हलवण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी उल्हासनगर येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83561 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top