भिवंडी पालिकेच्या उपमहापौराचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पालिकेच्या उपमहापौराचा राजीनामा
भिवंडी पालिकेच्या उपमहापौराचा राजीनामा

भिवंडी पालिकेच्या उपमहापौराचा राजीनामा

sakal_logo
By

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) ः भिवंडी महापालिकेचे उपमहापौर इमरान खान यांनी आज (ता. २५) आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. सहा महिन्यांपूर्वीच ते काँग्रेसमधून राष्ट्रवादीत सामील झाले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय गोटात चर्चांना उधाण आले आहे. खान हे विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे बोलले जात आहे, पण आपण व्यक्तिगत कारणांसाठी राजीनामा दिल्याचे खान यांनी सांगितले.

भिवंडी महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत ८ जून रोजी संपुष्टात येत प्रशासकीय राजवट सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (ता. २५) शेवटची महासभा होती. नवनियुक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची ही पहिलीच सभा असल्याने सभागृह विशेष फुलांनी सजविण्यात आले होते. महापौर प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी उपमहापौर इमरान खान, सभागृह नेते सुमित पाटील, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, माजी महापौर विलास पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नीलेश चौधरी, मनोज काटेकर, सभापती प्रशांत लाड, रिषीका राका अदी नगरसेवक उपस्थित होते.

या सभेत उपमहापौर इम्रान खान यांनी अचानक उपमहापौर व नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे नगरसेवक चकित झाले. व्यक्तिगत कारणास्तव हा राजीनामा देत असल्याची माहिती उपमहापौर इमरान खान यांनी दिली. इमरान खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून सध्या काम करीत असून त्यांच्या पत्नीही नगरसेविका आहेत. आगामी काळात राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढावे म्हणून त्यांनी आता विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या सभेकडे अनेक नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने ९० पैकी अवघे ५८ नगरसेवक सभेस उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83586 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top