वासिंद पूर्वेला पोलिस चौकी उभारण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासिंद पूर्वेला पोलिस चौकी उभारण्याची मागणी
वासिंद पूर्वेला पोलिस चौकी उभारण्याची मागणी

वासिंद पूर्वेला पोलिस चौकी उभारण्याची मागणी

sakal_logo
By

वासिंद, ता. २६ ( बातमीदार) ः वासिंद शहराच्या पूर्व भागात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस चौकी उभारण्याची मागणी मानव विकास सुरक्षा समितीतर्फे करण्यात आली. पोलिस ठाणे वासिंद पश्चिममध्ये असल्याने पूर्वेतील नागरिकांची गैरसोय होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी मानव विकास सुरक्षा समितीच्या प्रकाश वाघमारे यांनी मंगळवारी (ता.२४) शहापूर तालुका पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांची भेट घेतली. तसेच वासिंद पूर्वेला पोलिस चौकी उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन वासिंद पूर्वेला पोलिस चौकीची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उप अधीक्षकांनी दिल्याचे प्रकाश वाघमारे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83603 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top