कंत्राटी चालकांना वेतनवाढ द्यावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी चालकांना वेतनवाढ द्यावी
कंत्राटी चालकांना वेतनवाढ द्यावी

कंत्राटी चालकांना वेतनवाढ द्यावी

sakal_logo
By

नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रशासनातील कंत्राटी वाहनचालकांच्या वेतनात वाढ करण्यात यावी, तसेच त्यांना वेतन वेळेवर देण्यात यावे. त्यांचा पीएफ न भरणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

महापालिकेत ‘समान कामाला, समान वेतन’ हे अनेक वर्षांपासून केवळ ऐकावयास मिळत आहे; परंतु प्रत्यक्षात समान कामाला समान वेतन प्रत्यक्षात आजतागायत आलेच नाही. महापालिकेच्या वाहन विभागात कंत्राटदारांच्या माध्यमातून काम करणाऱ्या सर्व कंत्राटी वाहनचालकांना केवळ १२ ते १३ हजार रुपये या मासिक वेतनावरच काम करावे लागत आहे. महापालिकेत काम करणाऱ्या सफाई कामगारांना मात्र १८ ते २० हजार वेतन दिले जात आहे. कंत्राटी वाहनचालकांना मिळणारे वेतन महागाईच्या तुलनेत हे वेतन तुटपुंजेच आहे. अन्य कायम सेवेतील वाहनचालकांचे वेतन पाहता समान कामाला समान वेतन; तर सोडा समान कामाला अर्धे वेतनही या कंत्राटी वाहनचालकांना मिळत नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83611 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top