
खासदार बृजभूषण सिंहविरोधात मनसे आक्रमक
घाटकोपर, ता. २६ (बातमीदार) : भाजप खासदार बृजभूषण सिंह हे मुंबईत येऊन उत्तर भारतीयांसाठी सभा घेणार असल्याचे सांगितले जाते. त्याची तारीख अजून ठरलेली नसली, तरी हा मनसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशात मनसे कार्यकर्त्यांना मारण्याची भाषा करून मुंबईत सभा घेऊन उत्तर भारतीयांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात सोडणार नाही, अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे.
बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला डिवचण्याचा प्रकार करणार असेल, तर आम्ही महाराष्ट्रात त्याला पाऊल ठेवू देणार नाही, असे नुकतेच वैभव खेडेकर यांनी जाहीर केले; तर मनसैनिक राजू सावंत यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद पुन्हा पेटणार का? की राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाची परीक्षा घेतली जाणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या वेळी प्रतिक्रिया देताना मनसैनिक राजू सावंत यांनी सांगितले, की ‘‘आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. देशावर संकट उभे राहील, त्या वेळेस आम्ही हिंदुत्व म्हणून रस्त्यावर उतरू आणि मराठी माणसावर संकट ओढवेल, त्या वेळेस आम्ही मराठी म्हणून रस्त्यावर उतरू. जे उत्तर भारतीय महाराष्ट्राला मानतात ते आमचे आणि विनाकारण विरोधात जातील त्यांच्यावर खळखट्याक करू,’’
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83633 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..