ठाणे : जेवणात भात नीट शिजवला नाही, रागाच्या भरात पत्नीची हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News
जेवण नीट न केल्याच्या रागातून पत्नीची हत्या

ठाणे : जेवणात भात नीट शिजवला नाही, रागाच्या भरात पत्नीची हत्या

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) ः खोणी गावात जेवण चांगले बनविले नाही, या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केल्याने तिचा जखमी अवस्थेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी नवऱ्याला पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. शंकर वाघमारे (२३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ज्योत्स्ना वाघमारे (२०) असे मारहाणीत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. शंकर-ज्योत्स्ना पती-पत्नी भिवंडी तालुक्यातील खोणी गाव येथील पाटील चाळीत राहतात. शंकर हा भंगार विक्रीचे काम करतो. जेवणात वाढलेला भात व्यवस्थित शिजवला नाही. त्यामुळे पती-पत्नीत वाद झाला. यावेळी शंकर याने रागाच्या भरात ज्योत्स्नाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकून त्याच्या घरात धाव घेतली. ज्योत्स्नाला स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केले. त्यामुळे निजामपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शंकर वाघमारे यास अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नरेश पवार करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g83634 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Thanecrimebhiwandi
go to top